हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असून विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे अस स्पष्टीकरण मोर्शी चे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहे. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर नाराजी व्यक्त केली होती. येवडच नव्हे तर थेट पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र भुयार यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली होती.
याबाबत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, मी अजित पवारांच्या संपर्कात असून अन्य अपक्ष आमदारही महाविकास आघाडी सोबत आहे. संजय राऊत यांनी माझ्या पक्षाला मतदान करु नको, असे सांगितले तरी मी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. यापूर्वीही मी हे सांगितले होते, आताही तेच कारणार आहे.