जिंकेन किंवा हरेन, मी उभा आहे घटनेच्या संरक्षणासाठी; सिब्बल यांची भावनिक टिप्पणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसांपासून फक्त कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करत आहेत. आज त्यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करताना काही भावनिक टिप्पणी केली.

कपिल सिब्बल यावेळी म्हणाले, हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. पण मी इथे उभा आहे घटनेच्या संरक्षणासाठी…. घटनात्मक सार्वभौमत्त्व हे आमच्या हृदयाशी अगदी जवळचे आहे आणि घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी मी इथे उभा आहे असं भावनिक विधान कपिल सिब्बल यांनी केलं.

दरम्यान, सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर बोट ठेवत शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना बहुमत सिध्द करायला कस काय बोलवलं असा सवाल करत हे सगळं चुकीचं आहे असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. राज्यपालांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हे सुद्धा स्पष्ट झालं नव्हतं असं म्हणत राज्यपालांनी घेतलेले निर्णय रद्द करा अशा मागणी कपिल सिब्बल यांनी केली.