टीचकी वाजवत म्हणतील, देवाकडून बंद होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मीच सुरू केला ः आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | सगंळ साताऱ्यात त्याच्यामुळे होत आहे. आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो सुध्दा मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले. मीच पॅनेलमध्ये आहे का हे मलाच माहीत नाही. पॅनेलचा निर्णय शरद पवार, अजित पवार व रामराजे नाईक- निंबाळकर घेतील त्यांना त्यांनी बोलावं, असे सांगत.

सातारा जिल्हा बँकेत काल शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यात आलेले आहेत. यामध्ये मी तसेच राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत अद्याप पॅनेलचे कोणतेही नाव नाही तसेच हे पॅनल पक्षविरहित असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात DCC बँक आणि पालिकेवरून वाद वाढला आहे. आज (दि. 26) खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी 10 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं.