हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमृता फडणवीस विविध कार्यक्रमात सहभागीही होतात आणि विविध प्रश्नांना बेधडकपणे उत्तरे देत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांना एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात मंगळसूत्राविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जोरदार चर्चेत आहे.
तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न विचारला असता त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते अस म्हणत त्यांनी हातातील मंगळसूत्र दाखवले. तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असं तुम्हाला वाटत असेल, अशी मिश्कील टिप्पणीही अमृता फडणवीस यांनी केली.
दरम्यान, तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारला असता त्या म्हणाल्या, प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात. अस म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.