मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणेंसोबतच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कोळंबकर सतत सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोळंबकर म्हणाले की, मी इतकी वर्षे आमदार आहे मात्र लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न सोडविले. मुख्यमंत्र्यांनी माझी खूप कामे केली, ‘आता फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन’, असे त्यांनी सांगितले आहे.
राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्या काही अटी मान्य झाल्या तरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाचे –
राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात
नगरमधील हात अखेर कमळाकड़े गेलाच..!!
राष्ट्रवादीला मोठा धक्का… ‘यांचा’ भाजप प्रवेश