हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निडवणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे बारामतीची निवडणूक.. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद- भावजयीच्या लढाईत मधल्या काळात विजय शिवतारेंनी सुद्धा अपक्ष अर्ज भरत रंगत आणली होती. दोन्ही पवारांना पाडण्यासाठी मी उभा आहे असेही शिवतारे म्हणाले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यानुसार शिवतारेंनी अर्ज मागे घेतला आणि सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला. परंतु आता निवडणूक निकालानंतर शिवतारेंनी एक मोठं विधान करत अजित पवारांना डिवचलं आहे. मी अपक्ष उभा असतो तर १००० टक्के जिंकलो असतो असं विजय शिवतारेंनी म्हंटल आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विजय शिवतारे म्हणाले, बारामतीत महायुतीची जागा निवडून यावी, अशी सर्वांची इच्छा होती, पण ही जागा जर मी अपक्ष लढलो असतो, तर एक हजार टक्के जिंकलो असतो. कारण दोन्ही उमेदवारांना मोठा विरोध होता. इथे पक्ष नाहीत, तर दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक पवार प्रो आणि दुसरा पवार विरोधी आहे. पाच लाख ८० हजार इतकं पवार विरोधी मतदान आहे. त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं नव्हतं. त्यामुळे मी एक हजार टक्के निवडून आलो असतो.
दरम्यान, शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या जमिनीच्या मुद्द्यावर सुद्धा शिवतारेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार कोणाचही ऐकून जाहीर स्टेटमेंट देत असतील तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो. तुम्ही कोणाचही ऐकून नका ना बोलू. विजय शिवतारेने जे काही केलं आहे ते सगळ्यांना माहित आहे. मी सगळं उघड-उघड केलं आहे असं विजय शिवतारे म्हणाले,