आता दरवर्षी अनुभवा ‘टी-२० वर्ल्ड कप’ चा थरार !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलबरोबरच आता दरवर्षी टी-२० वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीनं अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरू आहे. आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी-२० वर्ल्ड कप तर, दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.

आयसीसीला जागतिक मिडीया अधिकार बाजारात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एका मोठ्या वृत्तवाहिनीसोबत आयसीसीची बोलणी सुरू आहे. दरम्यान बीसीसीआय आयसीसीच्या या प्रस्तावाशी सहमत नाही आहे. त्यामुळं या दोघांमध्ये या प्रस्तावावरून वाद सुरू आहे.

आयसीसीच्या प्रस्तावामुळं बीसीसीआयच्या कार्यक्रमांकावर आणि मिडीया अधिकारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या वर्ल्ड कपचे आयोजन चार वर्षांतून एकदा केले जाते. तर, टी-२० वर्ल्ड कपची योजना दोन वर्षातून एकदा केली जाते. २००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड दक्षिण आफ्रिका येथे खेळवण्यात आला. त्यानंतर २००९ मध्ये दुसरा वर्ल्ड कप झाला. एका वर्षात २०१० मध्ये तिसऱ्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. मात्र आयसीसीच्या एफटीपी कॅलेंडर पाहता दरवर्षी टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन इतर देशांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

Leave a Comment