अंपायर सायमन टॉफेल यांच्या मते, धोनीचं जगातील सर्वात ‘स्मार्ट माईंडेड’ खेळाडू, कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांची चाणाक्ष अंपायर म्हणून क्रिकेट विश्वात ओळख आहे. क्रिकेट मैदानातील त्यांचे निर्णय फारच कमी वेळा चुकत असतील. मैदानावरील घडणारी प्रत्येक गोष्ट सायमन टॉफेल यांच्या नजरेतून चुकत नाही. इतकेच काय सामना कितीही अटीतटीचा बनला असला तरी दबावात न जात योग्य निर्णय त्यांच्याकडून दिले गेले आहेत. आपल्या क्रिकेट अंपायरिंगच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कर्णधारांचा खेळ आणि सामन्यातील रणनीती जवळून पहिली आहे. दरम्यान, नुकतेच सायमन टॉफेल यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केलं आहे.

सायमन टॉफेल यांनी क्रिकेट वर्ल्ड या संकेतस्थळाशी बोलताना म्हटले आहे की, भारताचा माजी भारतीय कर्णधार स्मार्ट क्रिकेट माईंड ठेवतो. धोनी हा क्रिकेटविश्वातील सर्वात हुशार खेळाडू आहे. हे मी केवळ तो भारतीय असल्यामुळे म्हणत नाहीये, तर कारण तो नेहमीच मला क्रिकेट फिल्डवर तसा वागताना दिसला आहे. सायमन टॉफेल यांनी क्रिकेट वर्ल्डला सांगितले की, ‘तो आश्चर्यकारकपणे रणनीती बनवणारा चिंतक आहे आणि त्याच्याकडे उत्तम क्रिकेट ब्रेन आहे. त्याचा स्वभाव आणि स्वतःवरील संयम भन्नाट आहे.

क्रिकेट वर्ल्डसोबतच्या संभाषणा दरम्यान टॉफेल यांनी केप टाऊनमधील एका कसोटी सामन्याचा उल्लेख केला, ”जेव्हा स्लो ओव्हर रेटसाठी धोनीला दंड ठोठावला गेला. ते म्हणाले की, ”श्रीशांत केपटाऊनमध्ये ओव्हर टाकण्यासाठी 7-8 मिनिटे घेत होता, त्यामुळे आम्हाला धोनीला कमी ओव्हर रेटचा दंड ठोठावा लागला. यानंतर पंच व धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, आम्ही त्यांच्याशी ओव्हर रेटबद्दल बोलत होतो. टॉफेल पुढे म्हणाले, “आम्ही धोनीला सांगितले होते की जर त्याने डरबनमध्येही अशीच चूक पुनरावृत्ती केली तर त्याला मॅच बंदीचा सामना करावा लागू शकतो.” यावर धोनी म्हणाला की, ‘ठीक आहे मला ब्रेक हवा आहे. मी सामना संपवून निघून जाईल. पण श्रीसंत त्या सामन्यात खेळत नाहीये, म्हणून काळजी करण्याची गरज नाही.” त्याच्या या उत्तरानंतर मला त्याच्या स्मार्ट स्वभावाचा अनुभव आला.

दरम्यान, धोनीच्या क्रिकेटमधील कारकिर्दीवर नजर टाकल्यास, धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.1 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. त्याने 350 एकदिवसीय सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. धोनीने 98 टी-20 मध्ये 37.6 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. तर कर्णधार म्हणून धोनीचा रेकॉर्ड याहून उत्तम आहे. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी – आयसीसीच्या या तीन स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना ३ वेळा कप जिंकला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment