रोहित – विराट जगात भारी !! वनडे क्रिकेट मध्ये विराट नंबर 1 तर रोहित दुसऱ्या स्थानी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने वन डे क्रिकेट रँकिग (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. त्यात भारतीय क्रिकेट चे कर्णधार – उपकर्णधार अग्रस्थानी असून पुन्हा एकदा त्यांनी आपला दबदबा राखला आहे. वन डे रँकिगमध्ये टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर हिटमॅन रोहित शर्माचंही (Rohit Sharma) दुसरं स्थान अबाधित आहे. गोलंदाजांमध्ये यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) तिसरं स्थान कायम राखण्यास यश आले आहे.

कोहलीने आपले अखेरचे एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आणि अखेरच्या दोन सामन्यांत ८९ व ६३ धावांची खेळी केली होती.त्यामुळे त्याने अव्वल स्थान राखले आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्याने त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना जानेवारी २०२० मध्ये खेळला होता. मात्र, असे असतानाही त्याने दुसरे स्थान कायम राखले आहे.

विराटकडे एकूण 870 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर रोहितच्या नावावर 842 पॉइंट्स आहेत. या दोघांशिवाय टीम इंडियाचा एकही फंलदाज टॉप 10 मध्ये नाही. गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा प्रमुख बोलर जसप्रीत बुमराहने तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. बुमराहकडे एकूण 700 रेटिंग्स पॉईंट्स आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’