हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात होणाऱ्या ICC World Cup 2023 च्या स्पर्धेसाठी श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघांची निवड झाली आहे. झिम्बाब्वे येथे पार पडलेल्या पात्रता स्पर्धेत या दोन संघांनी विजय मिळवला आहे. यानंतरच वन डे वर्ल्डसाठीचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकात श्रीलंका आणि नेदरलँडच्या सामन्याविषयी महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत.
जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात श्रीलंकेचा संघ आता ७ ऑक्टोंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. तसेच ९ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. त्याचवेळी, नेदरलँड संघ ६ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर ११ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्ध शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळणार आहे.
दरम्यान वर्ल्ड कप २०२३ ची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. ग्रुप स्टेजच्या शेवटचा सामनाऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. पहिला सामना बुधवार १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.
मुख्य म्हणजे, विश्वचषकात एकूण १० संघ १० वेगवेगळ्या ठिकाणी आपले सामने खेळणार आहेत. हे सामने हैदराबाद, धर्मशाला, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, पुणे, लखनऊ, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी रंगणार आहेत. तर सराव सामने हे हैदराबाद व्यतिरिक्त गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर दरम्यान होणार आहेत.
विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी Click Here