हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. आर्थिक व्यवहार सुद्धा आता आपण ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. डिजिटल व्यवहारांमुळे आपलं काम जरी हलकं झालं असलं तरी यामुळे फ्रॉड करणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे उदाहरण आपण ऐकले असेलच .. त्याच पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध बँक असलेल्या ICICI ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. तसेच अशा फसवणुकीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही (ICICI Bank Advisory for customers) जारी केली आहेत.
बँकेचा ग्राहकांना नेमका सल्ला काय?
ICICI CICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या एडवाइजरी नुसार, ग्राहकांनी कोणतीही बनावट लिंक्स किंवा फाईलवर क्लीक करू नये, कारण सायबर क्राईम वाले तुमची फसवणूक करण्यासाठी अशा लिंकच्या माध्यमातून जाळे टाकण्याचा प्रयत्न करतात.
कधी कधी स्कॅमर तुम्हाला OTP मागतात आणि एकदा का तुम्ही त्यांना OTP दिला कि मग तुमच्या मोबाईल नियंत्रण ठेवतात.. परंतु बँक आपल्या ग्राहकांना कधीही अमुक नंबर वर कॉल करा आणि किंवा अमुक अँप डाउनलोड करा असं सांगत नाही. त्यामुळे जर तुमच्या बाबतीत अशा घटना घडल्या तर वेळीच सावध व्हा आणि बँकेशी संपर्क साधा.
स्कॅमर्सपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अँटी-व्हायरस डाउनलोड करू शकता.
जेव्हा तुम्ही नवीन कोणतेही अँप डाउनलोड कराल तेव्हा ते फक्त Google Play Store आणि App Store वरूनच डाउनलोड करा.
जर बँकेचे (ICICI Bank)अँप डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही डाउनलोड केलेले अँप अधिकृत आहे का ते चेक करा.
चुकूनही कोणाला ओटीपी, पासवर्ड, पिन किंवा कार्ड नंबर कोणाला सांगू नका.
कोणतीही फसवणूक झाल्यास त्याची त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार करा.