हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाने जगभरातील लोकांना अक्षरशः वेडच लावले आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍप असलेले WhatsApp हे देखील आपल्या दररोजच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. कोणत्याही कामासाठी संवाद साधण्याचा हा एक अत्यन्त सोपा मार्ग बनला आहे. आता तर बँकांकडूनही WhatsApp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या दरम्यानच खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक अससेल्या ICICI Bank ने देखील आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंगची सुविधा सुरु केली आहे. आता आपल्याला ICICI बँकेच्या WhatsApp नंबरवरून चॅटद्वारे अकाउंट बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटसह अनेक सर्व्हिसेसचा लाभ घेता येईल. यासोबतच ग्राहकांना WhatsApp च्या मदतीने एफडी सुरु करणे आणि बिल भरण्याची सुविधा देखील मिळेल.
अशा प्रकारे वापर ICICI Bank च्या WhatsApp बँकिंगची सुविधा
>> ICICI Bank च्या WhatsApp बँकिंगचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये 8640086400 हा क्रमांक सेव्ह करा.
>> यानंतर WhatsApp ओपन करा आणि ICICI बँकेत रजिस्टर्ड असलेल्या नंबरद्वारे या नंबरवर ‘Hi’ असे लिहून पाठवा.
>> यानंतर बँकेकडून उपलब्ध सर्व्हिसेसची लिस्ट आपल्या समोर उघडेल.
>> आता लिस्टमधून आवश्यक सर्व्हिसेसचा कीवर्ड टाइप करा आणि वापरण्यासाठी त्यावर क्लिक करा.
ICICI Bank द्वारे दिली जाणारी WhatsApp बँकिंगची सुविधा
>> अकाउंट बॅलन्स
>> मिनी स्टेटमेंट (शेवटचे 3 ट्रान्सझॅक्शन )
>> क्रेडिट कार्ड लिमिट
>> कार्ड ब्लॉक/ब्लॉक माय कार्ड
>> इन्स्टंट लोन एक्सक्लूसिव्ह फॉर यू
>> इन्स्टासेव्ह
>> फिक्स्ड डिपॉझिट्स
>> बिल पेमेंट
>> ट्रेड सर्व्हिसेस
या सुविधांचा 24×7 लाभ घेता येईल
आपल्याला 24×7 ICICI Bank च्या WhatsApp बँकिंगच्या सुविधांचा लाभ घेता येईल. यामध्ये बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट पाहणे यासह इतरही अनेक सुविधा मिळतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/online-services/WhatsApp-Banking/index.page
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज
Post Office च्या FD मध्ये आकर्षक व्याजदरासोबतच मिळतात ‘या’ सुविधा
Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या