ICICI बँकेचे सर्व्हर झाले डाऊन, नेट बँकिंग अन् अ‍ॅपही बंद

ICICI Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शुक्रवारी दुपारपासून ICICI बँकेच्या इंटरनेट सेवेत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नेट बँकिंगपासून ते मोबाइल अ‍ॅप्सपर्यंत कोणतेही काम नीट होत नाही आहे. इतकेच नाही तर बँकेच्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ICICI डायरेक्टची वेबसाइटही डाऊन झाली आहे. ICICI डायरेक्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,’ सर्व्हर डाउन आहे आणि आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

जेव्हा युझर्स नेट बँकिंगसाठी लॉग इन करत आहेत तेव्हा त्यांना एरर मेसेज मिळत आहेत. ज्यामध्ये असे लिहिले आहे की- “तुम्ही ज्या पेजला भेट देण्याचा प्रयत्न करत आहात ते सध्या उपलब्ध नाही. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” बँकेच्या मोबाइल अ‍ॅप iMobilePay वर लॉग इन करतानाही ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तिथेही तोच मेसेज येतो आहे आणि पेज देखील ओपन होत नाहीये.

ICICI Bank Net Banking, ICICI Direct, Icici bank server down, iMobilePay, icicidirect.com, आईसीआईसीआई बैंक नेट बैंकिंग में दिक्‍कत क्‍यों हो रही है, आईसीआईसीआई बैंक

डायरेक्टच्या ट्विटर हँडलवरूनही ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हटले गेले आहे, “प्रिय ग्राहकांनो, icicidirect.com सध्या बंद आहे. परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य स्थिती पूर्ववत होताच आम्ही तुम्हाला येथे अपडेट करू. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

लोकं करत आहेत तक्रार
इंटरनेट सर्व्हर ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector ला देखील ICICI बँक इंटरनेट बँकिंग एररबद्दल अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. 44 टक्के तक्रारी ऑनलाइन लॉगिनबाबत येत आहेत. वेबसाइटनुसार, 33 टक्के लोकं ऑनलाइन बँकिंग तर 23 टक्के लोकं मोबाइल बँकिंगमध्ये येणाऱ्या समस्येचा संदर्भ देत आहेत. ICICI डायरेक्ट वेबसाईट डाउन झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू असतानाच हा अडथळा आला.