हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank कडून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 ते 15 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर 8 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.
IDFC First Bank च्या वेबसाइटनुसार,1 वर्ष कालावधीसाठीचा MCLR 8.80% तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठीचा दर 8.50% आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांसाठीचा MCLR 8.20% तर एका महिन्यासाठी आणि ओव्हरनाईट कालावधीचा MCLR 7.95% आहे. इथे हे लक्षात घ्या कि, पगारदार लोकांसाठी होम लोनचा दर 7.50% पासून सुरू होतो तर स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी होम लोनचा दर 7.75% आहे. त्याचबरोबर पर्सनल लोनसाठीचा व्याज दर 10.49% पासून सुरू होतो. जो जास्तीत जास्त 25% आहे.
MCLR म्हणजे काय ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँकाकडून कर्जासाठीचा व्याजदर ठरवला जातो. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केला जात असे. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात झाल्यास त्याचा परिणाम नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर होतो. निधीची मार्जिनल कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट, कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) आणि कालावधी प्रीमियमच्या आधारावर त्याची गणना केली जाते. IDFC First Bank
30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत, IDFC फर्स्ट बँकेच्या फंडेड एसेट्स वार्षिक आधारावर 21% तर तिमाही आधारावर 6.7% वाढून ₹1,37,685 कोटी झाली आहे. ग्राहकांनी Q1FY23 मध्ये ₹1,02,363 कोटी डिपॉझिट्स ठेवले. ज्यामध्ये वार्षिक आधारावर 20.6% आणि तिमाही आधारावर 9.8% वाढ झाली. 30 जून 2022 रोजी CASA रेशयो 50.3% तर 31 मार्च 2022 पर्यंत ते 48.4% होते. IDFC First Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates
हे पण वाचा :
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!
SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे नवीन दर पहा