इस्लामाबाद । पाकिस्तानमध्ये सलग तिसर्या दिवशी हल्ल्यांची फेरी सुरूच आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी पुन्हा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले आणि IED चा स्फोट घडवून आणला. पास्नी किनारपट्टीतील खुदा बख्श मार्केट येथे झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी लष्कराचा कॅप्टन आणि एक हवालदार ठार झाले आहेत. खुद्द पाकिस्तान लष्कराच्या मीडिया विंगनेही याची पुष्टी केली आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशनने (ISPR) एका निवेदनात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) वापरुन सुरक्षा दलावर हल्ला केला. निवेदनानुसार या हल्ल्यात कॅप्टन अफान मसूद आणि कॉन्स्टेबल बाबर झमान हे ठार झाले आहेत. कॅप्टन अफान मसूद दोनच महिन्यांपूर्वी बाप झाला होता.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे
ISPR ने सांगितले की,”हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. या भ्याड कृत्यामागे जो कोणी आहे तो सुटू शकणार नाही. याखेरीज बलुचिस्तानमध्ये जी शांतता पूर्ववत झाली आहे ती कोणीही हिसकावू शकत नाही. सुरक्षा दले दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतींवर रोखण्यासाठी कटिबद्ध आहे.”
एक दिवसापूर्वीच कुरम जिल्ह्यात पाक सैनिक ठार झाले
एक दिवस आधीच, पाकिस्तानच्या आदिवासी कुरम जिल्ह्यातील जेवा भागात दहशतवाद्यांनी 15 पाकिस्तानी सैनिकांना घेराव घालून ठार केले. या हल्ल्यामागे पाकिस्तानी तालिबानचा हात असल्याचे सांगितले जात होते. स्थानिक माध्यमांच्या सूत्रांचा हवाला देत हेही कळले होते की,”63 सैनिकांचे अपहरण झाले होते. मात्र, पाकिस्तानी सैन्याने अधिकाऱ्यासह दोन सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे तर अन्य तीन जखमी असल्याचे सांगण्यात आले.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा