राहुल गांधी, सोनिया गांधीवर ED ने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरती ईडीने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा ठराव केल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कराड येथे काँग्रेस पदाधिकारी नव संकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ईडीने केलेल्या कारवाई विरोधात ठराव करण्यात आला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठराव मांडला. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, रणजितसिंह देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, राजेंद्र शेलार, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडी कारवाई बाबत आम्ही आज ठराव घेतलेला आहे. एक प्रकारची दहशत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेली आहे. ईडीने केलेल्या कारवाईचा मी निषेध केला आहे. यापुढे आणखी काही कारवाई केल्यास संपूर्ण राज्यातील जनता पेटून उठेल आणि जेलभरो कार्यक्रम करण्याचा आमचा निर्धार आहे.