जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झुंझुनूंमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 10 वीच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांच्या भीतीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून क्लास बंक करीत होता आणि याबाबत घरातील सदस्यांना कळाले. यामुळे पालकांच्या भीतीने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
मृत भूपेंद्र हा हा टागोर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र बऱ्याच दिवसांपासून शाळेत जात नव्हता. याबाबत पालकांना कळालं तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलण्याचं ठरवलं. यानंतर भूपेंद्र पुरता घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. भूपेंद्रचा मोठा भाऊ रिक्षा चालवित होता. त्या दिवशी गावावरुन भूपेंद्र रिक्षातून भावासोबतच आला होता. मध्य रस्त्यात मित्राकडे जायचं सांगून तो रिक्षातून खाली उतरला. सकाळी शाळेत जाणार असल्याचे त्याने आपल्या भावाला सांगितले.
यानंतर भूपेंद्रने आत्महत्या केली. शाळेच्या विद्यार्थ्यानी सर्वात आधीत भूपेंद्रला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. हे विद्यार्थी कॅन्टीनच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांना एका झाडावर भूपेंद्र लटकलेल्या अवस्थेत दिसला. विद्यार्थ्यांनी तातडीने शाळेच्या व्यवस्थापनेला याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पुढील तपास सुरु केला.