हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या बाबतीत ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात भेटी घेतल्या आहेत. अशा नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा देखील समावेश आहे. प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. यावरूनच प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे एकत्र आले तर याचा फटका पेशवाईला बसणार आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
मागील 45 दिवसांपासून सतत सिव्हिल हॉस्पिटल अमरावती येथे युथ कॉंग्रेस अमरावती कडून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवन तसेच आरोग्य सेवा ही निवार्थ पणे करीत आहेत.
आज मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटल ला जाऊन भेट दिली.
या युवक काँग्रेसच्या चमुला मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. pic.twitter.com/N12yd57wbt— Nana Patole (@NANA_PATOLE) June 12, 2021
नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत अमरावतीमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाची परिस्थिती, राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. संभाजीराजेंनी यापूर्वी देखील एका पत्रकार परिषदेदरम्यान वेळ आली तर वेगळा पक्ष स्थापन करू असं म्हंटल होतं.यावरूनच बोलताना नाना पाटोळे यांनी बोलताना येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल शिवशाही ला बसणार नाही अशी टीका केली आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोनानंतर उद्भवणार्या आजारावर केंद्र सरकारकडून इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाहीत. आज राज्यात 50 हजार पोस्ट covid-19 रुग्ण असताना चार ते पाच हजार इंजेक्शन देतात. पण बाहेर या इंजेक्शनची काळाबाजारी केली जाते. यामुळे अनेकांना आपला जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाशी काही देणंघेणं नाही ते सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करत असल्याचा घणाघाती आरोपही नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.