Monday, February 6, 2023

बॉयफ्रेंडच्या नकळत तरुणी करायची ‘हे’ भलतेच काम चार्जरमधील छुप्या कॅमेऱ्याने झाली पोलखोल

- Advertisement -

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या कारनाम्याची पोलखोल करण्यासाठी अत्यंत हुशारीने कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या बॉयफ्रेंडने सांगितले कि त्याला जवळपास सहा वर्षांपासून प्रेयसीवर संशय होता. म्हणून त्याने तिचे पितळ उघडे पाडण्यासाठी एका सिक्रेट कॅमेऱ्याचा वापर केला. हा कॅमेरा त्याला ऑनलाईन मिळाला. हा कॅमेरा दिसताना एखाद्या चार्जरसारखाच दिसतो. जर तुम्हीच बारकाईने बघितले तर त्याच्या यूएसबी चार्जिंग पॉईंटवर एक लेन्स आहे. यामुळे लोकांची सगळी गुपिते उघडी पडू शकतात. हा सगळा अनुभव सांगणारा व्यक्ती अमेरिकेत ‘मिस्टर सर्विलान्स’ नावाचा एक प्रसिद्ध टिक टॉक यूजर आहे.

त्याने आपल्या गर्लफ्रेंडबाबत सत्य जाणून घेण्यासाठी एका गुपित कॅमेऱ्याचा वापर केला. त्याने या घटनेचा व्हिडिओ अपलोड करताना लिहिले,की मी जीवनात याआधी कधीच असे पहिले नाही. कृपया माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नका. यानंतर त्याने आपल्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं. घरातून बाहेर निघण्यााआधी त्याने योग्य ठिकाणी चार्जर ठेवले होते. काही दिवसांनंतर त्यानं एक फॉलोअप व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड त्याला धोखा देत असल्याचे दिसत आहे. सिक्रेट कॅमेऱ्याने बनवलेला हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बॉयफ्रेंड स्वतः हा चार्जर किचन वॉलच्या सॉकेटमध्ये लावताना दिसत आहे. त्याने हा चार्जर एका यूएसबी पोर्टसोबत कनेक्ट केला होता. ज्यामुळे कॅमेरा लपून राहायला मदत होईल.

- Advertisement -

हा चार्जर तिथे लावल्यानंतर बॉयफ्रेंड पार्कींगमध्ये लावलेल्या आपल्या गाडीत जाऊन बसला. त्याने सांगितले कि की तो आपल्या गाडीमध्ये बसून कॅमेऱ्याची सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग फोनवर पाहात होता. या व्हिडिओमध्ये अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्याची गर्लफ्रेंड एका व्यक्तीचा हातात हात घेऊन आत आलेली त्याला दिसली. हे पाहाताच त्याच्या मनात अनेक सवाल उपस्थित झाले. यानंतर हे दोघे दुसऱ्या रुममध्ये जाण्याआधी एकमेकांना किस करताना कॅमेऱ्यात दिसत आहे. हा व्हिडिओ अपलोड करताना त्याने लिहिले कि माझ्या आयुष्यातली सहापेक्षा अधिक वर्षे बरबाद. यानंतर बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला हा व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ पाठवून त्याने आपले नाते संपले. आता लवकर तुझं सामान बांध. आशा आहे, की तू खूश राहाशील.असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटसुद्धा केली आहे.