कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कवठे (मसूर ) येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंगाची शनिवार दि. 8 मे व रविवार दि.9 मे रोजी होणारी यात्रा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सलग दुस-यावर्षी रद्द करण्यात आली. यात्रेला बाहेरगावचे माहेरवाशिण, पै- पाहुणे यांना यात्रेसाठी बोलवू नये, तसेच ज्यांच्या घरी पाहुणे येतील त्यांना ग्रामपंचायतीने एक हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागेल. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.
सदरचा निर्णय ग्रामपंचायत पदधिकारी व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यावेळी उंब्रज पोलिस स्टेशनचे सपोनि अजय गोरड, सर्कल के.टी.वाघमारे, कवठेचे लोकनियक्त सरपंच लालासाहेब पाटील, नविन कवठेचे उपसरपंच गणेश घार्गे, ग्रामसेवक संदिप निकम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबराव यादव, पोलिस पाटील मारुती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अजय गोरड म्हणाले, यात्रेदिवशी धार्मीक विधी पुजारी करतील व नंतर मंदिर बंद केले जाईल. या दिवशी दर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच पालखी मिरवणूक काढण्यात येवू नये. तसेच यात्रेच्या अनुषंगाने कोणीही कार्यक्रमाचे आयोजन करु नये. तसेच गावातील भाविकांना श्री चे दर्शनास बंदी घालण्यात आली आहे.
सदर बैठकीस ग्रामपंचायत सदस्य अधिकराव यादव,दिपक यादव,अशोक किरत,विलासराव माने, शशिकांत शेलार, धनाजी पाटोळे,विशाल यादव,हिरामन साळुंखे, विनोद यादव,अधिक पुजारी आदी उपस्थित होते. आभार नविन कवठेचे उपसरपंच गणेश घार्गे यांनी मानले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba