कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. आमच्या पिढी वंचित राहिली, भविष्यातील पिढीला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे. अन्यथा उद्रेक होईल. बाकीच्या समाजासाठी आरक्षण देताना कुठली कमिटी नव्हती. गायकवाड समितीने अहवाल दिला. तरी पुरावे असून सुध्दा आरक्षण मिळत नाही. पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही जातीच्या विरोधात नाही तर स्वताः च्या हक्कासाठी आवाज उठवतायत. लोकांचा उद्रेक वाढला तर कोणीच रोखू शकत नाही. मी कालही होतो, आजही आहे आणि भविष्यातही सोबत असणार असल्याचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाटण तालुक्यातील सखल मराठा समाजातील युवकांचे पाटण तहसीलदार कार्यालय येथे गेले ४८ दिवस बेमुदत राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलन चालू होते. या आंदोलनाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंदोलन स्थगितच्या बाबतीत तहसीलदार पाटण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आज मराठा समाजातील युवकांच्या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन छत्रपती शिवराय व स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर युवकांशी आरक्षण बाबतीत चर्चा केली. त्यानंतर मराठा समाज आंदोलनकर्त्यांना पाणी देऊन आंदोलन सोडवले. यावेळी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील उपस्थित होते.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, दीड महिन्यापासून पाटण तालुक्यात तरूण आंदोलनास बसलेले होते. प्रत्येकांच्या मतदार संघात मराठा समाज आहे. इतर समाजाला जसे आरक्षण दिले आहे. तसे आमच्या समाजालाही मिळावे. मराठा समाजातील कोणीच व्यक्ती इतर समाजाला आरक्षण देवू नका असे म्हणत नाही.
दुर्देवाने अशोक चव्हाण प्रमुख
मराठा आरक्षण प्रश्नी दुर्देवाने एवढे जेष्ठ नेते अशोक चव्हाण प्रमुख असताना. मराठा आरक्षणांसाठी त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होते. अशी काय घाई त्यांना होती. आम्ही बोलायची इच्छा प्रकट केली की प्रत्येक वेळेला म्हणायचे राजे आपणनंतर बोलूया म्हणायचे. मुंबई, दिल्लीतून जेष्ठ वकील हजर होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा