टोल वर FASTag द्वारे जर जास्त टोल कट केला असेल तर आपण तो ‘या’ मार्गाने परत मिळवू शकाल

Fastag
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य झाले आहे. परंतु तरीही फास्टॅगद्वारे अधिक पैसे कट केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पेटीएम (Paytm ) ने पुढाकार घेतला आहे. पेटीएम पेमेंट्सने एक फास्ट रिड्रेसल मेकॅनिज्म विकसित केले आहे. चुकीची वजावट ओळखून एक्स्ट्रा चार्ज ताबडतोब परत करण्यासाठी क्लेम करतो.

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, ‘पेटीएम पेमेंट्स बँकेने जादा शुल्क आकारलेल्या ग्राहकांची प्रकरणे फास्ट मोडमध्ये सोडविण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. हे टोल व्यवहार आणि टोल प्लाझाच्या संबंधित तक्रारीची कसून तपासणी करते. पेटीएम पेमेंट बँकेने (Paytm Payment Bank) म्हटले आहे की,” त्यांनी आपल्या फास्टॅग ग्राहकांच्या 82 टक्के प्रकरणांचा निकाल लावला आहे. तथापि, हे महत्वाचे आहे की आपण पेटीएमकडून फास्टॅग खरेदी केले असले पाहिजे.”

2.6 लाख FASTag यूजर्सना रिफंडची सुविधा दिली
पेटीएम पेमेंट बँकेने जाहीर केले आहे की,” त्यांनी 2020 मध्ये टोल प्लाझावर चुकीच्या पद्धतीने पैसे कपात केलेल्या 2.6 लाख FASTag यूजर्सना रिफंडची सुविधा दिली आहे.” पेटीएम पेमेंट बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गुप्ता म्हणाले,” आम्ही आमच्या ग्राहकांना रस्त्यावर एक सोपा आणि त्रास-नसलेला प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सक्षम बनवू इच्छितो. या प्रक्रियेत आम्ही आमच्या यूजर्सना प्रत्येक प्रकारे सपोर्ट देत आहोत. टोल प्लाझा येथे त्यांना आलेल्या कोणत्याही तक्रारीवर जलद मदत करतात. यूजर्सकडून प्रत्येक वेळी योग्य टोल आकारण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दुचाकी वाहनांना डबल शुल्क द्यावे लागेल
जर आपण अद्याप आपल्या गाडीवर फास्टॅग इन्स्टॉल केले नसेल तर ते लवकरात लवकर करा, कारण यासाठी तुम्हाला दुप्पट टोल शुल्क भरावा लागू शकतो. देशात फक्त दुचाकी वगळता सर्व वाहनांवर FASTag टॅग लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.