रेशनकार्ड अन् वितरणासंबंधित समस्या असेल तर करा फोनवरून तक्रार दाखल; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | रेशनकार्ड हे सरकारी कागदपत्र आहे. सरकारी वितरण प्रणालीमधून कमी खर्चामध्ये दुकानांमधून गहू, तांदूळ आणि इतर गरजेच्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये मिळतात. परंतु वितरण प्रणालीमध्ये बऱ्याच वेळा कमी धान्य वाटप केल्याचे अथवा काहीतरी कारण सांगून धान्य न दिल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल होत आहेत. नेहमी असे निदर्शनास आले आहे की, राशनधान्य दुकानदार कार्डधारकांना त्यांच्या कार्डनुसार धान्य देण्यास टाळाटाळ करत असतात. जर आपल्यालाही अशी काही समस्या असेल तर आपण शासनाने दिलेल्या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करू शकता.

नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल (NFSA) वरती वेगवेगळ्या राज्यांसाठी टोल फ्री क्रमांक दिले गेले आहेत. या क्रमांकावर फोन करून आपण तक्रार दाखल करू शकता. सोबतच NFSA च्या वेबसाईटवरही तक्रार दाखल करता येऊ शकते. https://nfsa.gov.in या वेबसाईटवर मेल करून तक्रार दाखल करता येऊ शकते. आपण महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर, महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1800-425-9339 ह्या क्रमांकावर तक्रार दाखल करू शकते. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे फोन नंबर्स आहेत. प्रत्येक राज्याची राशन कार्ड बनवन्याची पद्धतही वेगवेगळी आहे.

वितरण प्रणालीमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि खाद्यान्न वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाईन नंबर सरकारने सुरू केले आहेत. यामार्फत होणारा भ्रष्टाचार आणि टाळाटाळ कमी होऊन सबसिडी वाल्या राशनकार्डधारक गरीब कुटुंबास राशन मिळू शकेल. गरिबांसाठी असलेले धान्य हे राशन दुकानदार मोठ्या प्रमाणात साठवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. यावर कारवाई करण्यासाठी वेगवेगळे उपाय केंद्रशासन वेळोवेळी करत असते. कार्डधारकांना जर सुनिश्चित प्रमाणात धान्य मिळाले नाही तर ते वर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.