सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा पालिकेवर प्रशासक असल्याने सत्तारूढ आघाडीने दुर्लक्ष केल आहे. अशावेळी नगरपालिकेचे एखादे टेंडर असते, तर सातारा विकास आघाडीचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी येऊन बसले असते. तुझा की माझा काॅन्ट्रक्टर आणि कुणाच्या काॅन्ट्रक्टर हे बघायला उपनगराध्यक्षांपासून सगळेच येवून बसले असते, अशी खोचक टीका खासदार उदयनराजेंची सत्ता असलेल्या सातारा विकास आघाडीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
साताऱ्यातील वाय. सी. कॉलेज येथे पाईपलाईन फुटल्याने 5 दिवसापासून सातारा शहरात पाणीपुरवठा खंडित झाला. या कामाची पाहणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली असून प्राधिकरणाला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. सातारा पालिकेने जबाबदारी झटकली असून नागरिकांसाठी पर्यायी टँकरची व्यवस्था न केल्याने नाराजी व्यक्त केली. अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून आज टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला.
सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी विकासकामे अडवली होती. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा विकास आघाडीचे प्रमुख काय करत होते? असा सवाल खासदार उदयनराजेंना उपस्थित केला. पालिकेत तुमचं अपयश आणि पैशासाठी टेंडरबाजी दिसत आहे. हे खासगीत तरी बोलायचं होत. उघड उघड बोलून आपली अब्रू घालवू नये, असा सल्ला अप्रत्यक्षपणे खासदार उदयनराजेंना दिला.