देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतरही ‘हा’ आमदार मुख्यमंत्र्याच्या भेटीला; पाठींब्याबाबत म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशा महाविकास आघाडी व भाजपकडून राज्यसभेच्या जागेच्या विजयासाठी एकेक मत मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे. अगदी छोट्या पक्षाच्या आमदारांपासून ते अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून गळ टाकला जात आहे. अशातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या फोन नंतरही निकोल यांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. .

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशा परिस्थितीत छोट्या पक्षांच्या आमदारांचे आणि अपक्ष आमदारांचे मात्र, भलतेच महत्व वाढले आहे. त्यामुळे अशा आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजप व शिवसेनेकडून तयारी केली जात आहे. निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडून लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांना फोन केले जात आहेत. तसेच त्याची भेटही घेतली जात आहे.

दरम्यान निवडणुकीत आपल्या पक्षातील उमेदवाराला पाठींबा देण्याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही फोन केला. परंतु पक्षाच्या निर्णयानुसार आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे आमदार निकोले यांनी फडणवीसांना सांगितले.

2019 च्या विधानसभा निवडणूक आणि निकालानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आताही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने शिवसेनेच्या पारड्यात आणखी एक मत पडणार आहे.

Leave a Comment