वॉशिंग्टन । जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून नुकतेच ह्युस्टनमधील चिनी दुतावास खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे चीन आधीच संताप असताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. ”आज आपण काही पावले उचलली नाही तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल. आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली नियमाधारित व्यवस्था मोडीत काढेल. त्यामुळे आज आपण चीनसमोर गुडघे टेकवले तर उद्या आपल्या मुलांना त्यांच्याकडे दयेची भीक मागण्याची वेळ येईल, असे माईक पॉम्पेओ यांनी म्हटले.
चीन ही मुक्त जगासमोरील सध्याची प्रमुख समस्या आहे. आम्ही एकट्याने या आव्हानाचा सामना करु शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो, जी७, जी २० या सगळ्यांच्या रुपाने असलेली आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी ताकद यासाठी गरजेची असेल. मात्र, या सगळ्यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असणे गरजेचे आहे. कदाचित आता आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आल्याचेही माईक पॉम्पेओ यांनी सांगितले.
General Secretary Xi Jinping is not destined to tyrannize inside and outside of China forever, unless we allow him: Mike Pompeo, US Secretary of State pic.twitter.com/XminGEIojl
— ANI (@ANI) July 23, 2020
याशिवाय येणाऱ्या काळात अमेरिकेकडून चीनसाठी अविश्वास आणि खातरजमा करण्याचे धोरण अवलंबिले जाईल. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी रशियाच्याबाबतीत खातरजामा केल्यानंतर विश्वास ठेवण्याचे Turst but Verify धोरण वापरल्याची आठवण माईक पॉम्पेओ यांनी करुन दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”