जर तुमचेही PNB मध्ये खाते असेल तर तुम्हाला मिळेल 20 लाख रुपयांचा मोफत लाभ, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेत हे खाते उघडल्यास तुम्हाला पूर्ण 20 लाख रुपयांचा लाभ मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर बँकेत हे खाते लगेच उघडू शकता. या खात्याचे नाव PNB MySalary Account अकाउंट आहे. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. चला तर मग या खात्याबद्दल तपशीलवार जाणून घेउयात.

PNB ‘या’ सुविधा पुरवणार आहे
PNB नुसार तुमची Salary आणखी चांगल्या प्रकारे manage करू इच्छित असाल तर PNB MySalary खाते उघडा. यासोबतच ओव्हरड्राफ्ट (अतिरिक्त पैसे काढणे) आणि स्वीप सुविधासह पर्सनल ऍक्सिडेंटल इन्सुरन्सही उपलब्ध असेल.

20 लाखांचा फायदा कसा मिळेल जाणून घ्या
PNB आपल्या Salary अकाउंट होल्‍डर्सना विमा संरक्षणासह अनेक फायदे देत आहे. झिरो बॅलन्स आणि झिरो मंथली ऍव्हरेज बॅलन्स सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यावर ग्राहकाला रु. 20 लाखांचे पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हरही दिले जात आहे.

या खात्याच्या 4 कॅटेगिरी
>> या खात्यात 10 हजार ते 25 हजार प्रति महिना Salary असणाऱ्यांना Silver कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.
>> याशिवाय 2500 ते 75000 पर्यंत Salary असलेल्यांना Gold कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.
>> 75001 रुपये ते 150000 रुपये Salary प्रीमियम असलेल्यांना Premium कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.
>> त्याचवेळी 150001 रुपयांपेक्षा जास्त Salary असणाऱ्यांना Premium कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.

3 लाखांचा लाभ कसा मिळेल ?
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. Silver कॅटेगिरीतील लोकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याशिवाय Gold कॅटेगिरीसाठी 150000, Premium कॅटेगिरीसाठी 225000 आणि Premium कॅटेगिरीसाठी 300000 ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार आहे.

या लिंकला भेट द्या
अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary saving products.html या लिंकला भेट देऊ शकता.

Leave a Comment