नवी दिल्ली । जर तुम्हालाही आधार कार्ड बनवायचे असेल तर आता ते बनवण्यासाठीचे काही नियम बदलले आहेत. नवजात मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचे आधार कार्ड बनवता येते. हॉस्पिटलमध्ये मुलांच्या उपचारापासून ते शाळेत दाखल होण्यापर्यंत त्याची गरज असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठीचे नवीन नियम जाणून घ्या.
आता पाच वर्षांखालील मुलांचे फिंगर प्रिंट आणि डोळे स्कॅन होणार नाही, मात्र जेव्हा ते पाच वर्षांपेक्षा जास्त असतील तेव्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे बंधनकारक असेल.
आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
>> जर तुमच्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आधार बनवण्यासाठी मुलाचे बर्थ सर्टिफिकेट आवश्यक असेल.
>> बर्थ सर्टिफिकेट नसेल तर मुलाच्या पालकांपैकी कोणाचेही आधार कार्ड चालेल.
>> पालकांकडे आधार कार्ड नसेल तर अशा परिस्थितीत अर्ज रद्द होईल.
>> 5 वर्षांखालील मुलांची बायोमेट्रिक इन्फर्मेशन घेतली जात नाही. अशा अर्जदारांचे फक्त फोटोच पुरेसे आहेत.
>> दुसरीकडे मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असल्यास बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करावे लागेल.
>> यामध्ये फिंगरप्रिंट, रेटिना स्कॅन आणि मुलांच्या दहा बोटांचे फोटो देणे बंधनकारक आहे. 15 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा अपडेट करावे लागेल.
>> मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला जन्म दाखला, शाळेचे ओळखपत्र आणि गावप्रमुखाचे पत्र याची कॉपी हवी आहे.
>> शाळेचा ओळखपत्र नसताना, शाळेच्या लेटर हेडवर लिखित स्वरूपात डिक्लेरेशन सादर करावे लागेल.
>> आधार कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे गोळा करा.
अशा प्रकारे बनवा आधार कार्ड
>> मुलाचे आधार कार्ड मिळविण्यासाठी, तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आधार सेवा केंद्राला भेट द्या आणि एनरॉलमेंट फॉर्म भरा.
>> एनरॉलमेंट फॉर्ममध्ये पालकांचा आधार नंबर आणि ऍड्रेस प्रूफसाठी त्यावर नमूद केलेला पत्ता भरा.
>> मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करा. हा फॉर्म सर्व आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर मुलाचा फोटो घेतला जाईल.
>> मुलाचे वय पाच वर्षांहून जास्त असल्यास, फॉर्म सबमिट केल्यानंतर मुलाची बायोमेट्रिक रेकॉर्ड केला जाईल. जर मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर फोटो पुरेसा आहे.
>> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक एनरॉलमेंट स्लिप तयार केली जाईल आणि तुम्हाला दिली जाईल. त्यावर एनरॉलमेंट आयडी, नंबर आणि तारीख टाकली जाईल.
>> या एनरॉलमेंट आयडीच्या मदतीने तुम्ही आधार कार्डचे स्टेट्स तपासू शकाल.
>> आधार एनरॉलमेंटनंतर 90 दिवसांच्या आत अर्जदाराच्या घरी आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाते.
आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, UIDAI वेबसाइट http://uidai.gov.in वर जा आणि एनरॉलमेंट नंबर, तारीख आणि वेळ एंटर करा. अर्ज केल्यानंतर 25% नंतर आधार कार्ड डाउनलोड करता येईल.