LIC चे पॉलिसीधारक असाल तर IPO खरेदी करण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा

LIC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LIC चा IPO 31 मार्चपूर्वी येणार आहे. LIC च्या निर्गुंतवणुकीसाठी सरकारने सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केला आहे. ड्राफ्ट मसुद्यानुसार, LIC आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. LIC च्या पॉलिसीधारकाला राखीव कोट्याचा लाभ मिळेल.

एक किंवा दोन पॉलिसी घेणारे ग्राहक देखील IPO मध्ये सहभागी होऊ शकतात. IPO मध्ये प्रति ग्राहक 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. तुम्ही LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO खरेदी करू इच्छित असाल तर ‘या’ पाच गोष्टी नक्की जाणून घ्या.

स्वतःचे डीमॅट खाते आवश्यक आहे
IPO साठी अर्ज करण्यासाठी, पॉलिसीधारकाचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. कोणताही पॉलिसीधारक त्याच्या जोडीदाराच्या, मुलाच्या किंवा नातेवाईकांच्या डिमॅट खात्यातून अर्ज करू शकणार नाही. सवलतीनंतर, कोणत्याही पॉलिसीधारकाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स मिळणार नाहीत. पॉलिसीधारक अनिवासी भारतीयांना (NRIs) राखीव श्रेणीचा लाभ मिळणार नाही.

जॉईंट पॉलिसीमध्ये फक्त एक संधी
जर एखाद्याने जॉईंट पॉलिसी घेतली असेल तर दोन पॉलिसीधारकांपैकी फक्त एकच आरक्षित श्रेणीमध्ये अर्ज करू शकेल. IPO साठी अर्जदाराचा पॅन नंबर पॉलिसी रेकॉर्डमध्ये अपडेट केला पाहिजे. जर डिमॅट खाते देखील जॉईंट असेल तर अर्जदार हा पहिला किंवा प्राथमिक खातेदार असावा. यामध्ये पॉलिसीधारकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, प्रस्तावक आरक्षित श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतो.

LIC कडे रेकॉर्ड असला पाहिजे
IPO खरेदी करण्यासाठी तुमच्या पॉलिसीचा रेकॉर्ड LIC कडे असणे आवश्यक आहे. जर एखाद्याने ड्राफ्ट पेपर सबमिट करण्यापूर्वी पॉलिसी खरेदी केली असेल आणि नंतर त्याला बाँड लेटर मिळाले असेल तर तो IPO देखील खरेदी करू शकतो. जे 13 फेब्रुवारीनंतर पॉलिसी खरेदी करतील ते पात्र असणार नाहीत.

कर्मचाऱ्यांकडे अनेक पर्याय आहेत
LIC ने IPO चा काही भाग आपल्या कर्मचार्‍यांसाठी राखून ठेवला आहे. जर एखाद्याकडे LIC पॉलिसी असेल तर तो कर्मचारी, पॉलिसी रिझर्वेशन आणि रिटेल गुंतवणूकदार म्हणून स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो. अशा गुंतवणूकदारांनी केलेले तीनही अर्ज व्हॅलिड असतील, असे LIC ने स्पष्ट केले आहे.

लॉक-इन पिरियड नाही
IPO साठी अर्ज करणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी कोणताही लॉक-इन पिरियड असणार नाही. IPO स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्यानंतर पॉलिसीधारक त्यांचे इक्विटी शेअर्स विकू शकतील. साधारणपणे, IPO मध्ये गुंतवणूक करणारे काही गुंतवणूकदार लॉक-इन पिरियडच्या अटीच्या अधीन असतात.