नवी दिल्ली । सध्या डिजिटल ट्रान्सझॅक्शनचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. अशा अनेक वेबसाइट्स आणि अॅप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने आपण पैसे ट्रान्सफर करतो. मात्र त्याचवेळी फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. फसवणूक करणारे अनेक प्रकारे फसवणूक करत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा फसवणुकी बाबतचा इशारा दिला आहे. सेंट्रल बँकेने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांकडून होणाऱ्या नवीन फसवणुकीबाबत जागरूक राहण्यास सांगितले आहे. ही फसवणूक कशी टाळता येईल ते जाणून घेऊया.
RBI ने ट्विट करून माहिती दिली आहे
बँकिंग ट्रान्सझॅक्शनसाठी सुरक्षित वेबसाइट आणि अॅप्स वापरा. ट्रान्सझॅक्शनसाठी सार्वजनिक नेटवर्क टाळा. सिक्योर्ड डिजिटल ट्रान्सझॅक्शन तुमच्यापासून सुरू होतात.
.@RBI Kehta Hai..
Use secure websites and Apps for banking transactions. Avoid public networks. Safe digital transactions start with you.#PayDigital #StaySafe#beaware #besecure #digitalsafety#rbikehtahai https://t.co/mKPAIpnAOb pic.twitter.com/lRmtqsaRey— RBI Says (@RBIsays) February 1, 2022
अशा प्रकारे होते फसवणूक
सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी बँक किंवा फायनान्स कंपनीच्या (800 123 1234) टोल फ्री क्रमांक 1800 123 1234 (हा खरा क्रमांक नाही) सारखा नंबर मिळवतात. त्यानंतर आरोपी हा क्रमांक कॉलरवर किंवा बँक किंवा फायनान्स कंपनीच्या नावाने इतर कोणत्याही अर्जावर नोंदवतात. अशा परिस्थितीत तुम्ही Truecaller च्या मदतीने बँक किंवा फायनान्स कंपनीला फोन केला तर अनेक वेळा हा फोन सायबर गुन्हेगाराकडे जातो आणि ते तुमच्याकडून तुमची सर्व माहिती घेतात आणि सायबर गुन्हे करतात.
अशा प्रकारची फसवणूक टाळा
तुम्ही कोणत्याही बँक किंवा फायनान्स कंपनीला कॉल करणार असाल, तर तुमच्याकडे तिच्या ट्रोल फ्री नंबरची संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच वेळी, कोणत्याही बँकेच्या टोल फ्री नंबरवर तुमची सर्व माहिती कधीही शेअर करू नका.