जर आपलेही पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर ‘हा’ नंबर तुमच्या मोबाईलमध्ये करा सेव्ह

नवी दिल्ली । तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असेल किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. भारतीय टपाल विभागाने आता नवीन इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या मदतीने तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या विविध लहान बचत योजनांची माहिती मिळवू शकता.

ही पूर्णपणे कम्प्युटराइज्ड सर्व्हिस आहे. ग्राहक PPF, NSC, सुकन्या समृद्धी (SSY) किंवा IVR सारख्या लहान बचत योजनांबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकतात. इंडिया पोस्टने यासाठी 18002666868 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून कॉल करून, ग्राहक कोणत्याही योजनेतील आपल्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतो.

अशा प्रकारे बॅलन्स चेक करा
जर तुम्हाला PPF किंवा इतर कोणत्याही योजनेचे खाते तपासायचे असेल, तर पहिले तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 18002666868 डायल करा. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी 1 दाबा. इंग्रजीसाठी नंबर 2 दाबा. यानंतर, कोणत्याही योजनेचा अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी 5 दाबा. त्यानंतर फोनमध्ये खाते क्रमांक टाका. नंतर हॅश (#) दाबा. यानंतर तुम्हाला फोनवर तुमच्या खात्यातील बॅलन्स सांगितला जाईल.

कार्ड कसे ब्लॉक करावे ?
तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचे एटीएम असेल आणि तुम्हाला कार्ड ब्लॉक करायचे असेल तर हे कामही ब्लॉक द्वारे केले जाईल. एटीएम कार्ड बंद करण्यासाठी 18002666868 डायल करा. नंतर 6 दाबा. त्यानंतर तुमचा कार्ड नंबर टाका. त्यानंतर खाते क्रमांक टाकावा लागेल. नंतर 3 दाबा. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सर्व्हिससाठी तुम्हाला 2 नंबर दाबावा लागेल. त्याच वेळी इतर सर्व्हिससाठी 7 नंबर दाबावा लागेल.