नवी दिल्ली । आयडीबीआय बँकेनेही आपल्या व्याज दरात बदल केला आहे, म्हणून जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट (fixed deposit) केली असेल तर एफडीवरील सुधारित व्याज दर (revised interest rates on FD) तुम्हाला कोणत्या दराने मिळतील हे त्वरित तपासा. बँकेचे हे नवीन व्याज दर 18 मार्चपासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवस ते 20 वर्षांपर्यंतच्या एफडी सुविधा ग्राहकांना देते. बँकेने केलेल्या दुरुस्तीनंतर 7 दिवस ते 20 वर्षांच्या कालावधीत 2.9 टक्के ते 5.1 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर दिले जात आहेत.
7 ते 14 दिवस आणि 15 ते 30 दिवसांच्या एफडीमध्ये आयडीबीआय बँक 2.9 टक्के दराने व्याज देते. याशिवाय 31 ते 45 दिवसांचे 3 टक्के व्याज, 46-90 दिवस, 3.25 टक्के व्याज, 91 दिवस ते 6 महिन्यांपर्यंत 3.6 टक्के व्याज दिले जात आहे.
6 महिन्यांच्या एफडीवर किती व्याज मिळेल?
6 महिन्यांपासून ते एका वर्षाच्या कालावधीत मुदतीच्या एफडीसाठी बँक 3.3 टक्के व्याज देते. त्याचबरोबर, एका वर्षापासून ते दहा वर्षांच्या फिक्स डिपॉझिटसाठी आयडीबीआय बँक 5.1 टक्के दराने व्याज देईल. 10 वर्ष ते 20 वर्षांच्या एफडीसाठी बँक 8.8 टक्के देईल.
एफडीवर किती व्याज मिळते
>> 7-30 दिवस – 2.9%
>> 31-45 दिवस – 3%
>> 46-90 दिवस – 3.25%
>> 91 दिवस – 6 महिने – 3.6%
>> 6 महिने 1 दिवस – 1 वर्ष – 4.3%
>> 1 वर्ष – 5%
>> 1 वर्ष ते 5 वर्षे – 5.1%
>> 5 वर्षे ते 10 वर्षे – 5.1%
>> 10 वर्षे ते 20 वर्षे – 4.8%
अॅक्सिस बँकेनेही आपल्या व्याज दरात केला बदल
खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेनेही आपल्या व्याज दरात बदल केला आहे. हे नवीन व्याजदर 18 मार्चपासून लागू झाले आहेत. बँक ग्राहक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतचे एफडी दर मिळवू शकतात. या दुरुस्तीनंतर अॅक्सिस बँक 7 दिवस आणि 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दर देत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा