नवी दिल्ली । PF (Provident Fund) खात्यासाठी UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर आवश्यक आहे. हा 12 अंकी नंबर आहे. कोणत्याही नोकरदार व्यक्तीचा UAN नंबर आयुष्यभर तोच राहतो. PF अकाउंट ऑपरेट करण्यासाठी UAN नंबर सोबत पासवर्ड देखील असतो. UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने PF अकाउंटचे स्टेट्स तपासले जाऊ शकते, फंड मॅनेज केला जाऊ शकतो आणि नॉमिनी इत्यादीसारखी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात.
म्हणूनच तुमचा UAN नंबर आणि त्याचा पासवर्डही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या दोन्ही गोष्टीही गोपनीय ठेवल्या पाहिजेत, कारण त्यांच्या मदतीने कोणीही तुमच्या PF शी संबंधित माहिती मिळवू शकतो. मात्र अनेकदा असे घडते की, एखाद्या व्यक्तीला त्याचा UAN नंबर आठवतो, पण तो त्याचा पासवर्ड विसरतो. जर तुम्हीही पासवर्ड विसरला असाल तर आता घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या UAN लॉगिनचा पासवर्ड बदलू किंवा रीसेट करू शकता. चला तर मग तुम्हाला यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊयात.
अशा प्रकारे तुमचा पासवर्ड रीसेट करा
EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकला भेट द्या.
UAN मेंबर e-SEWA चा लॉगिन बॉक्स होमपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. येथे UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चाचे बॉक्स रिकामे ठेवा.
तळाशी असलेल्या Forgot Password वर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल. Enter UAN बॉक्समध्ये तुमचा UAN number टाका. Enter Captcha बॉक्समध्ये कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर submit बटणावर क्लिक करा.
तुमचा UAN number नवीन पेजच्या वरच्या बाजूला दिसेल. याच्या खाली मोबाईल नंबरचे पहिले दोन अंक आणि शेवटचे दोन अंक PF खात्यात दिसतील.
पासवर्ड बदलण्यासाठी, जर या मोबाइल नंबरवर OTP हवा असेल तर Yes वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP नंबर येईल.
तो OTP बॉक्समध्ये एंटर करा आणि Verify बटणावर क्लिक करा. OTP चे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, नवीन पासवर्ड तयार करण्याचा पर्याय येईल.
मागील New Password बॉक्समध्ये तुमचा नवीन पासवर्ड टाका. Confirm Password बॉक्समध्ये तोच पासवर्ड पुन्हा एंटर करा. आता सबमिट बटणावर क्लिक करा.
कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनवर पासवर्ड यशस्वीरित्या बदलला असा मेसेज देखील दिसेल. मेसेजसोबत लॉगिन करण्याची लिंकही दिसते.
त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या नवीन पासवर्डने लॉग इन करून पासवर्ड तयार झाला आहे का ते तपासू शकता.