टीम हॅलो महाराष्ट्र । ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकाचा वाद मिटण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेले दिसत आहेत.
आज दिवसभर उदयनराजे ट्विटरवर या पुस्तकाबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. ”छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे हे भुंकणाऱ्यांनी लक्षात ठेवाव. विनंती फिनंती करत बसणार नाही पुस्तक प्रकाशन बंद करायलाच लावत असतो. राजेशाही असती तर पुस्तक काढणारा तो गोयल पुन्हा दिसला नसता.” अशा शब्दांत उदयनराजे यांनी धमकीवजा ट्विट केलं आहे. लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते. अशी समज सुद्धा उदयनराजे यांनी दिला आहे.
छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे हे भुंकणाऱ्यांनी लक्षात ठेवाव.
विनंती फिनंती करत बसणार नाही पुस्तक प्रकाशन बंद करायलाच लावत असतो. राजेशाही असती तर पुस्तक काढणारा तो गोयल पुन्हा दिसला नसता.— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 14, 2020
दरम्यान आज, शिवाजी महाराजांचे वंशज या नात्यानं आज उदयनराजे यांनी पुण्यात तब्ब्ल ५० मिनिट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी विरोधकांना प्रतिउत्तर देताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका करत तुफान फटकेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेवर करत शरद पवार यांना जाणता राजा उपाधी देण्यावरुनही उदयनराजेंनी जोरदार टीका केली.
लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते. pic.twitter.com/bQjeuTG2uh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 14, 2020