दिल्लीत उदयनराजे आणि नाना पटोले आले समोरासमोर आणि..

नवी दिल्ली । काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे आज दिल्लीत अचानक समोरासमोर आले. 10 जनपथजवळ या दोघांची अचानक भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. भिन्न पक्षाचे असून सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला साजेसा व्यवहार दोघांमध्ये यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, … Read more

अन..अलका कुबल उदयनराजेंच्या दरबारी; ‘हे’ होतं कारणं..

सातारा । साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका अर्ध्यातूनच सोडल्याचं समोर आलं. त्यानंतर अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक उडालीय. या वादासोबतच आता मालिकेच्या … Read more

मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास रथीमहारथींनाही साष्टांग नमस्कार घालायला तयार- उदयनराजे

सातारा । ‘मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असं विधान भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. याशिवाय आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. … Read more

आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; खासदार उदयनराजेंचा इशारा

सातारा। मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणी न्यायालयाने चार आठवडयांसाठी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी टीकास्त्र सोडले आहे. काय म्हणाले उदयनराजे? मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित … Read more

‘राजांना आम्ही काय सांगणार, ते प्रजेचं काम नाही’, मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजांना टोला

उस्मानाबाद । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत. उस्मानाबादनंतर आज तुळजापूर येथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यपाल, एकनाथ खडसे, शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टी यांसह मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी, भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील … Read more

‘आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, त्यातील पहिले सम्राट अशोक, दुसरे..’- प्रकाश आंबेडकर

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (prakash ambedkar on udayan raje) ”राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी … Read more

‘एक राजा बिनडोक, तर दुसऱ्या राजाचा आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर भर; प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक … Read more

उदयनराजेंनी मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी लढ्याचं नेतृत्व करावं; विनायक मेटेंची गळ

बीड । राज्यात मराठा आरक्षणाचा विषय अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आता मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी या लढ्याचं नेतृत्व करण्याची गळ भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना घातली आहे. चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील किशोर कदम या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. विनायक मेटे यांनी आज कदम कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर … Read more

शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय- काँग्रेस

मुंबई । राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना घोषणांवर आक्षेप घेतला. शिवाय अशी कृती न करण्याची तंबी दिली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यसभेतील या घटनेवरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more