हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आणखीन १५ दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊन वाढवला आहे. परंतु तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दररोज कोरोना बाधितांच्या मृत्यूत वाढ होत असल्याने यावर उपाय करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले आहे. “महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनामुळे लोक मरत आहेत. राज्यातील हे मृत्यू रोखायचे असतील तर पुरेशी प्रमाणात तरी लसींचा पुरवठा करावा,” अशी मागणी शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केली आहे. त्यांच्यानंतर स्वाभिमानीचे शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे लसीच्या पुरवठ्याबाबत मागणी केली आहे. त्या पत्रात शेट्टी यांनी म्हंटल आहे कि, “राज्यात दररोज लसीकरणाची मोहीम राज्य सरकारच्यावतीने राबविली जात आहे. तरी देखील मृत्यूची संख्या काही केल्या कमी होत नसल्याची दिसते. राज्य सरकारने आता ११ ते ४४ वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम ठेवली असून ४५ वयोगटापुढील लोकांच्या लसीकरणास सुरवात केली आहे.
राज्यातील अनेक कोरोना लसीकरण केंद्रात लसींचा तुटवडा भासत आहे. तर काही केंद्रेही कोरोनाचीच हॉटस्पॉट बनलेली आहेत. या वाढत असलेल्या हॉटस्पॉटच्या केंद्रामुळे कोरोनाबाधितांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. राज्य सरकारकडून कोरोना लसीसाठी केंद्राकडे मागणी केली जात आहे. असा परिस्थितीत कोरोना बाधितांची वाढत असलेले संख्या व होत असलेले मृत्यू कमी करायचे असतील तर केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान मोदीजी आपण महाराष्ट्र राज्याला पुरेशा प्रमाणात तरी सुरवातीला लसींचा पुरवठा करावा. आणि राज्यात वाढत असलेले मृत्यूचे थैमान रोखण्यासाठी मदत करावी,” अशी मागणीही स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.