सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
धर्मवीर चित्रपटात हूबेहूब आनंद दिघे साहेबांच चित्र पहायला मिळाले. प्रसाद अोक यांनी केलेल्या भूमिकेतून दिघे साहेब स्वतः असल्याचं जाणवले. गुरूपाैर्णिमेला त्या काळात गुरूचे दर्शन घेणे, ते शिवसैनिक करायचे. गुरूदक्षिणा कशी घ्यायची आणि श्रध्दा, निष्ठा कशी ठेवायची, हे पहायला मिळाले. शिवसेनेने कसे काम केले हे आपल्याला पहायला मिळते. सर्व शिवसैनिक गुरूपाैर्णिमेला साहेबांना भेटत होते, आता त्याच्यानंतरही उध्दव ठाकरे साहेबांनाही भेटतो. कट्टर शिवसैनिक शिवसेनेसाठी, पक्षासाठी काय करतो हे पहायला मिळते, असल्याचे शिवसेना आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट साताऱ्यात पाहण्यासाठी गेले होते. साताऱ्यातील सेव्हन स्टार या थिएटरमध्ये जावून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चित्रपट पाहिला.
शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला असून शिवसैनिकांसह लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद अोक यांनी साकारली आहे. तर एकनाथ शिंदे यांचाही जीनवपट या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. आनंद दिघे यांच्या जीवनातील अनेक घडामोडी चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या मराठी माणसांचा जीवनपट मांडण्यात आलेली आहे.