शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी अखेर येणार बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शीना बोरा हत्याकांडानंतर, पाच महिन्यांपूर्वी ‘ती’ जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) अखेर साडेसहा वर्षांच्या करावासानंतर अखेर बाहेर येणार आहे. तिने या अगोदर बाहेर येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालयाकडे 7 वेळा अर्ज केले होते मात्र न्यायालयाकडून ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते. यादरम्यान, इंद्राणीने (Indrani Mukherjee) कारागृहातही स्वतःचा दबदबा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर, हे प्रकरण समोर आले होते. 25 ऑगस्ट 2015 रोजी मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. यानंतर तिची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?
2012 मध्ये इंद्राणीने एका कारमध्ये शीनाची गळा दाबून हत्या केल्याची माहिती ड्रायव्हरने दिली होती. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा आधीचा पती संजीव खन्ना यालादेखील मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी याला शीना आपली बहीण असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली होती. 2012 साली शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

यानंतर हे प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा इंद्राणीनेच (Indrani Mukherjee) शीनाची कारमध्ये गळा दाबून हत्या करत, रायगड जिल्ह्यात तिचा मृतदेह जमिनीत पुरला. शीना बोराचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते, मात्र इंद्राणीने ते मान्य केले नव्हते. या हत्येप्रकरणी इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यालादेखील सीबीआयने अटक केली होती. मात्र 2020 साली त्याला जामीन मिळाला होता. या सुनावणीच्या काळात पीटर मुखर्जी याने इंद्राणी मुखर्जीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर जेव्हा सीबीआयकडून याप्रकरणाचा तपास बंद होत असताना, इंद्राणीने पाच महिन्यांपूर्वी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत सीबीआयला पत्र लिहिल्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण आले. कारागृहात आलेल्या एका महिलेला शीना काश्मीरमध्ये दिसल्याचे तिने यंत्रणेला सांगितले. याबाबत, सीबीआय अधिक तपास करत आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment