शेतकरी कुटुंबातील श्रध्दा पोखरकरची महिला IPL स्पर्धेसाठी निवड, कोण आहे श्रध्दा पोखरकर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – 23 मेपासून महिलांच्या आयपीएलला (IPL) सुरुवात होणार आहे. थेरगाव येथील व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीच्या श्रध्दा पोखरकर हिची महिला आयपीएल (IPL) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती या स्पर्धेत श्रद्धा ट्रायब्लाझर्स या संघाकडून खेळणार आहे.

कोण आहे श्रध्दा पोखरकर ?
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावची श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर हि एका शेतकरी कुटुंबातील आहे. श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण थोरांदळे गावात झाले. पिंपरीतील डी.वाय. पाटील महाविद्यातून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. क्रिकेट खेळाची तिला लहानपणापासूनच आवड असल्याने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत तिने सराव करण्यास सुरुवात केली. मागच्या पाच वर्षांपासून ती व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीत क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. श्रद्धा ही सध्या महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

यावर्षी झालेल्या महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाकडून खेळताना श्रद्धाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. श्रद्धा ही डावखुऱ्या हाताने वेगाने गोलंदाजी करते. तसेच मधल्या फळीत फलंदाजी करते. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडून काही दिवसांपूर्वी वरिष्ठ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये श्रद्धाने अष्टपैलू कामगिरी करताना नऊ विकेट घेतल्या होत्या. तिच्या या कामगिरीमुळे तिची महिलांच्या आयपीएलमध्ये (IPL) निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा मनात बाळगून तिने मोहन जाधव, भूषण सूर्यवंशी, डॉ. विजय पाटील, शादाब शेख, चंदन गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केला आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment