चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत सापडले १८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेरीनुसार, मागील २४ तासांत देशात १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. सध्या देशात १ लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ९५ हजार ८८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment