Indian Idol 12- टीकाकरांकडे दुर्लक्ष कर… झिनत अमान यांनी शन्मुखप्रियाला दिला मोलाचा सल्ला

Zeenat Aman_Shanmukhpriya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा रिअ‍ॅलिटी सिंगींग शो आजकाल रोज नव्या वादात अडकता दिसत आहे. एक वाद संपतो ना संपतो तोच दुसरा वाद पुढ्यात येऊन उभा राहताना दिसत आहे. एकीकडे स्पर्धक अंजली गायकवाड हिला शोतून बाहेर केल्यामुळे चाहते संतापले आहेत. तर दुसरीकडे शन्मुखप्रिया हिच्या गाण्यामूळे त्यांची सटकली आहे. नुकत्याच रविवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये केलेल्या परफॉर्मन्स मूळे शन्मुखप्रिया पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. लोकांनी पुन्हा एकदा तिला शोतून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान स्पेशल गेस्ट म्हणून आल्या होत्या. म्हणून शन्मुखप्रियाने त्यांच्यावर चित्रीत झालेले ‘चुरा लिया है’ गाणे गायले.

https://www.instagram.com/tv/CP033ovHs5N/?utm_source=ig_web_copy_link

‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात स्वरबद्ध झालेले आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातील हे गाणे अतिशय सुपरडुपर हिट ठरले होते. आजही हे गाणे अत्यंत लोकप्रिय आहे. पण ‘इंडियन आयडॉल १२’मध्ये शन्मुखप्रियाने हे गाणे गायले आणि चाहत्यांचा जणू रागाचा बांधच फुटला.

मग काय, यावरून नेटक-यांनी शन्मुखला जबरदस्त ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक मीम्स वायरल होताना दिसत आहेत. एका युजर ने तिची खिल्ली उडवित लिहिले की, बस करो दीदी हमे नहीं जानना की तुम कितनी तेज चिल्ला सकती हो..

https://twitter.com/TamannaLalwani/status/1401599542202540032

तर अन्य एकाने लिहिले की शन्मुखप्रिया गायला स्टेजवर येते तेव्हा माझा टीव्ही मी म्युट करते. हिला बाहेर काढा, प्रत्येकवेळी तू गाण्यांचा असा सत्यानाश करू शकत नाही, अश्या अनेक विवध कमेंट्सद्वारे नेटक-यांनी तिच्या गाण्याविषयी संताप व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/CPkuSVhLjZ_/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या कित्येक आठवड्यांपासून शन्मुखप्रिया प्रत्येक परफॉर्मन्स नंतर प्रचंड ट्रोल होतेय. या पार्श्वभूमीवर शोचा होस्ट आदित्य नारायणने झीनत अमान यांना एक प्रश्न विचारला. सध्या शन्मुखप्रियावर खूपजण टीका करत आहेत, याचा सामना तिने कसा करावा असे तुम्हाला वाटते? असे त्याने विचारले. यावर झीनत यांनी शन्मुख प्रियाला टीकाकारांकडे दुर्लक्ष करण्याचा खास सल्ला दिला. ‘शन्मुखप्रिया तू अजिबात दु:खी होऊ नकोस, रडूही नकोस. तू खास आहेस. काही लोकांना टीकाच करता येते, त्यांचे तेच काम असते. त्यांच्याबद्दल अजिबात विचार करू नकोस. फक्त पुढे जात रहा…,’ असे त्या म्हणाल्या.