सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलिस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांचे कोटयावधीचे अर्थिक घोटाळे समोर आले. वसुलीत वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिसही मागे नाहीत. त्यांच्या गैरकाभाराचे व्हिडीओ उपलब्ध असुन योग्यवेळी भाजपाच्या वतीने न्यायालयात सादर करू. दोन्ही तालुक्यात अवैद्य व्यवसाय करणाऱ्या टोळक्याबरोबर खाकी वर्दीही आर्थिकदृष्टया गब्बर झाली आहे.
मटका, दारू, तीनपानी, सावकारी, व्हिडिओ गेम, लॉजिंग हे अवैद्य व्यवसाय खाकी वर्दीच्या कृपाशिर्वादाने राजरोसपणे सुरू असल्याचे सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मटक्याच्या चिट्टया समोर टाकल्या. अवैद्य व्यवसाय चालकांकडुन खाकी वर्दीतील हप्ते वसुली करणाऱ्या पंटरची यादी नावासह उपलब्ध असुन ती योग्य वेळी जाहीर करू असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी दिला..
धैर्यशील मोरे म्हणाले,”वाळवा व शिराळा तालुक्यात दारू, शिंदी, मटका, मुरूम, वाळु वाहतुक, व्हिडिओ गेम, ऑनलाईन लॉटरी सेेंटर, वडाप, लॉज, बिअर बार, खाजगी सावकारी यासह अनेक अवैद्य व्यवसाय पोलिसांच्या कृपाआशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत.” हे सर्व व्यवसाय 15 मार्चपर्यंत बंद व्हावेत अन्यथा सर्व अवैध व्यवसाय भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंद करतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.