याला म्हणतात जबरा फॅन!! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सापत्नीक विठूरायाची पूजा केली. त्यानंतर पंढरपूरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने चक्क डोक्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा काढलेली पाहायला मिळाली.

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या या जबऱ्या फॅन ने डोक्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा कोरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकनाथ शिंदे यांचेही फॅन फॉलोअर्सवर जास्त आहेत हे यानिमित्ताने दिसून आले.

दरम्यान, या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात एक मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी आषाडी वारीच्या नियोजनासाठी प्रशासनाला 3 कोटींचा निधी दिला जात होता, पण आता पुढील वर्षा पासून यासाठी 5 कोटीची तरतूद करू अस शिंदे म्हणाले.