व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय हवामान विभागामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतीय हवामान विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

विभाग – भारतीय हवामान विभाग

पद संख्या – 165 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरली जाणारी पदे –

प्रकल्प वैज्ञानिक-III – 15 पदे
प्रकल्प वैज्ञानिक-II – 22 पदे
प्रकल्प वैज्ञानिक-I – 26 पदे
संशोधन सहयोगी – 34 पदे
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो – 68 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

प्रकल्प वैज्ञानिक-III: M.Sc./ B. Tech. / B.E आणि 7 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-II: M.Sc./ B. Tech. / B.E. आणि 3 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-I: M.Sc./ B. Tech. / B.E.

संशोधन सहयोगी: Ph.D. / M.S. (IMD Recruitment 2022)

वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो: पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्ष अनुभव.

मिळणारे वेतन –

प्रकल्प वैज्ञानिक-III: 78,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-II: 67,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-I: 56,000/- + HRA.

संशोधन सहयोगी: 47,000/- + HRA.

वरिष्ठ संशोधन फेलो : 35,000/-+ HRA

कनिष्ठ संशोधन फेलो: 31,000/- + HRA.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फी नाही

SC/ST – फी नाही

PWD/ Female – फी नाही

असा करा अर्ज –

सर्वप्रथम भारतीय हवामान विभागा अधिकृत वेबसाईट incois.gov.in ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – incois.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY