हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 1 एप्रिल रोजी रोजी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत लग्नाचे आणि नोकरीचे आमिष देऊन झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत पुराव्यासहित पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवावा. अशी मागणी केल्यानंतरही अजूनही गुन्हा नोंदवला गेला नसल्याने, नवीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन याचा यावर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी या प्रकरणातील पीडितेने केली आहे.
पीडितेने संबंधित मागणी करताना सोबतच हेही सांगितले की, ‘1 एप्रिलची पत्रकार परिषद झाल्यानंतर 2 एप्रिल रोजी राजेश उत्तमराव विटेकर यांनी माझ्या कुटुंबाची बदनामी करणारे पत्रक काढले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते सामाजिक माध्यमावरती वायरल केले. त्यामुळे मला खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्रीही या प्रकरणामुळे काही बोलले नाहीत. सध्या माझे कुटुंब पेट्रोल पंपावर झोपत आहे. दहशतीमुळे घरी जाऊ शकत नाही ‘ असे पिडीतेने सांगितले.
नवीन गृहमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माझ्यासारख्या पीडितेला न्याय मिळवून द्यावा. व पुराव्यानिशी केलेल्या आरोपानुसार राजेश उत्तमराव विटेकर व त्यांची आई निर्मलाबाई उत्तमराव विटेकर यांच्यावर तातडीने कुणाची गुन्हा दाखल करावा. सोबतच जिवंत असेपर्यंत या गुन्ह्याची नोंद होऊन मला न्याय मिळावा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी न्याय द्यावा अशी मागणी पीडितेने केली.