Thursday, October 6, 2022

Buy now

साताऱ्यात विसर्जन मिरवणूक जल्लोषात : पावसातही तरूण- तरूणींचा डाॅल्बीवर ठेका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात गणपती विसर्जन मिरवणुका मुसळधार पावसात पारंपारिक वाद्यांसह डाॅल्बीच्या ठेक्यावर पार पडल्या. दोन वर्षानंतर विसर्जन मिरवणुकीत तरूणांसह- तरूणींनीहीं ठेका धरलेला पाहायला मिळला. अत्यंत शांतपणे, उत्साहात शनिवारी पहाटे 3 वाजता मिरवणुका संपल्या.

सातारा शहरासह अनेक भागात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. यावेळी साताऱ्यात बाप्पाच्या मिरवणुकीत पाऊस असला तरी देखील प्रचंड उत्साह पहायला मिळाला. काही वेळासाठी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये पावसामुळे व्यत्यय आला, तरी मुसळधार पावसात महिला आणि युवक- युवतींनी डॉल्बीच्या तालावर नाचताना उत्साह पाहायला मिळाले. कोरोना विषाणूमुळे दोन वर्ष विसर्जन मिरवणूक आणि जल्लोष करायला मिळाला नव्हता. परंतु काल विसर्जन मिरवणुकीत अनेकजण बेधुंद होवून नाचताना दिसून आले.

शहरातील मानाचे गणपती आणि सातारा शहरातील इतर भागातील गणपती राजवाडा येथील मोती चौक परिसरात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस पथक तैनात होते. तरीही एक साईटला पोलिसांच्या गाड्यांनी पार्किंग केलेली वाहनांमुळे गणपती मिरवणुकीत ट्राफिक जाम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल बाराच्या सुमारास स्वतः तेथे थांबून पाहणी करत होते. पोलिसांनी रात्री बारानंतर वाद्ये वाजविण्यास पूर्णपणे बंदी घातली होती.