हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Palm Oil : जुलैमध्ये भारताची पाम तेलाची आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 10% कमी झाली आहे. ट्रेड बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) कडून शुक्रवारी याबाबतची माहिती देण्यात आली आहे. रिफायनर्सनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी, त्यांच्या सार्वकालिक उच्चांकी किंमती कमी करण्यासाठी, वनस्पती तेलाच्या आयात शुल्कात सूट मिळावी म्हणून पर्यायी सोया तेलाची खरेदी वाढवली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
व्यापार्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेल आयातदाराने सोया तेलाची जास्त खरेदी केल्याने यूएस सोया तेलाच्या किंमतींना सपोर्ट मिळेल, मात्र प्रतिस्पर्धी पाम तेलाच्या (Palm Oil) भारतीय खरेदीतील वाटा प्रभावित करेल. तसेच यामुळे मलेशियन आणि इंडोनेशियन विक्रेत्यांना बाजारातील वाटा मिळविण्यासाठी सवलत देण्यास भाग पाडले जाईल.
सूर्यफूल तेलाच्या आयातीत 30% वाढ
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, जुलैमध्ये भारतातील पाम तेलाची (Palm Oil) आयात एका महिन्यापूर्वी 590,921 टनांवरून घटून 530,420 टन झाली आहे. जुलैमध्ये सोया तेलाची आयात 125% वाढून ती एका महिन्यापूर्वीच्या विक्रमी 519,566 टनांवर पोहोचली, तर सूर्यफूल तेलाची आयात 30% वाढून 155,300 टन झाली.
सूर्यफूल तेलाच्या आयातीला टॅक्समध्ये मिळाली सूट
मे महिन्याच्या उत्तरार्धात, स्थानिक खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किंमतींवर आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने 31 मार्च रोजी संपलेल्या चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी 20 लाख टन सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीला सूट दिली होती. यावेळी दलालांनी सांगितले की,” जून अखेरपर्यंत पाम तेलावर (Palm Oil) सोया तेलाचा प्रीमियम $150 प्रति टन पेक्षा कमी होता, मात्र पाम तेलावर 5.5% आयात टॅक्स आकारला जात असल्याने, भारतीय खरेदीदारांसाठी पाम तेल प्रभावीपणे जास्त महाग होते.”
प्रति टन 350 डॉलर्सचा फरक
गेल्या काही आठवड्यांमध्ये सोया तेल आणि पाम तेलातील (Palm Oil) फरक प्रति टन $350 पेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे रिफायनर्सना पाम तेलाची खरेदी करणे सोपे झाले आहे. एका जागतिक व्यापार संस्थेच्या मुंबईस्थित डीलरने सांगितले की, “ऑगस्टमध्ये पाम तेलाची आयात 700,000 टनांपेक्षा जास्त होऊ शकते. कींमतीत सुधारणा झाल्यानंतर जुलैमध्ये जोरदार खरेदी झाली.”
खाद्यतेल याच देशांतून येते
हे लक्षात घ्या कि, जुलैमध्ये मलेशियन पाम तेलाच्या (Palm Oil) किंमती वर्षभरातील नीचांकी पातळीवर आल्या. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेलाची खरेदी करतो, तर अर्जेंटिना, ब्राझील, युक्रेन आणि रशियामधून सोया तेल आणि सूर्यफूल तेल आयात करतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.agriwatch.com/edible-oils/palm-oil/
हे पण वाचा :
PM Awas Yojana चा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला !!! कोणा-कोणाला करता येईल अर्ज ते पहा
Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!
‘या’ कार्डच्या साहाय्याने Flipkart वर मिळवा 12% पर्यंतचा कॅशबॅक !!!
Har Ghar Tiranga Yojana : टपाल विभागाने वितरित केले 1 कोटींहून जास्त राष्ट्रध्वज !!!