आरोग्यमंत्रा | सुक्या मेव्यातील सर्वांच्या आवडीला उतरणारा पदार्थ म्हणजे काजू होय. काजू जेवणापासून सौदर्यवृद्धी पर्यत सर्वच स्तरात उपयोगी पडणारा पदार्थ आहे. काजू खायला लागलं कि खातच राहवं वाटत कारण यात असणारी अल्प प्रमाणातील गोडी आणि त्याची स्वाफ्ट चव सर्वानाच आवडते. चला तर मग जाणून घेवू काजूचे फायदे
काजू आठवड्यातून फक्त दोन वेळा खाल्ला पाहिजे. काजू खाल्याने शरीराला आवश्यक असणारे पोषक पोषक घटक आपणास यातून मिळतात. तसेच काजूचे सेवन आपल्या हाडांना मजबुती देते. त्याच प्रमाणे तुमची ठिसूळ होणारी हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवते.
काजूमध्ये कॉपर नावाचा घटक सामावलेला असतो. या घटकामुळे आपले केस अधिक काळेभोर होतात. तसेच केस गळायचे देखील कमी होतात. त्याच प्रमाणे आपले दात आणि हिरड्या मजबूत करण्याचे काम देखील काजूचे सेवन करते. काजूमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्याला सौंदर्यप्रसादनात देखील स्थान आहे. काजू भिजत घालून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर चमक येते. तसेच काजू कोलेस्ट्राल फ्री असल्याने हृदयाच्या आजारापासून देखील अराम मिळतो. तसेच काजूमध्ये मोनो सेच्युरेटेड फॅट अधिक असल्याने ते हृदयाला निरोगी ठेवतात.
विशिष्ट प्रमाणात काजू खाल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यातील पाल्मोटीक अॅसिड गुड कॉलेस्ट्रॉल तयार करून रक्ताभिसरणात प्रवाह आणते. यात सोडिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण कमी असल्याने त्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.