महत्वाचा निर्णय : राज्यात सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार किराणामालाची दुकानं…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच महाराष्ट्र राज्यात सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. यात किराणामाल आणि जीवनावश्यक सेवा या नियमित चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार किराणामालाची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज मध्यरात्रीपासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

नुकत्याच मिळालेल्या अपडेट नुसार महाराष्ट्र सरकारने सुरू असणाऱ्या निर्बंधाच्या गाईडलाईन्स मध्ये काही बदल केले आहेत. नवीन आदेशानुसार आता किराणा मालाचे दुकान, डेरी, मच्छी मार्केट सकाळी सात ते अकरा याच वेळेत सुरू राहणार आहे.

राज्यातील सर्व किराणा, भाजी, दुकान, फळ दुकान व डेरी,बेकर सर्व खाद्य दुकान ( चिकन, मटन, पोल्ट्री, फिश, यासह ) कृषी उत्पादनांशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधीत वस्तूंची दुकाने देखील दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत होम डिलिव्हरी मात्र देता येणार आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळेच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेतील असे नव्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत संचार बंदीचे नियम लागू केले. यात जीवनावश्यक गोष्टींसाठी मुभा देण्यात आली होती. हे नियम 1 मेपर्यंत लागू करण्यात आले होते. याच मोहिमेअंतर्गत आता नवी गाईडलाईन जारी केलेली आहे.