आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

१) सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

२) महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारात मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

३) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४) कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

५) शासन अनुदातीत खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन लागू करण्याचा नियम आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Comment